सिल्लोड शहरात कोळीवाडा येथे आयोजित मौलाना आझाद कर्ज वितरण सोहळ्यास उपस्थिती दर्शविली
.,,,,,शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि,,,,,,मौलाना आझाद फायनान्सच्या माध्यमातून आठशे लोकांना कर्ज मिळणार आहे. मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी या कर्जाचा उपयोग होईल. आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला व कर्ज मंजूर झालेल्यांना शुभेच्छा दिल्या. आगामी काळात सर्वसामान्य जनतेची सेवा करतांना कुठेही कमी पडणार नाही अशी हमी यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यानी दिली. या प्रसंगी मौलाना आजाद चे जिल्हा व्यवस्थापक औरंगाबाद चे शेख जहीर युसुफ हेड क्लार्क शेख फारूख पाशा मोहम्मद आमेर सलीम क्लार्क आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.