निर्णय जनहिताचा.सन्मान लाडक्या बहिणींचा.
शेख़ नईम सिल्लोड प्रतिनिधि सिल्लोड शहरातील भगतसिंग चौक, जैनुद्दीन कॉलनी येथे आज लाडक्या बहिणींना संसार उपयोगी साहित्य भांड्यांचे संच व बांधकाम कामगारांना कामगार किटचे वाटप केले. लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी असून कधीच बंद होणार नाही. आगामी काळात लाडक्या बहिणींच्या पगारात तीन हजारांची भरघोस वाढ होईल असा विश्वास उपस्थित बहिणींना दिला.तुमचा आशिर्वाद आणि साथ अशीच कायम राहू द्या..बहिणींची सेवा करतांना तुमचा भाऊ कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली.विकासकामे असतील किंवा वयक्तिक कामे असतील ते करतांना कधीही जात, धर्म,पक्ष बघितला नाही.सिल्लोड शहरात विविध जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने आणि आनंदात राहतात. शहरासह मतदार संघातील जनतेने जातीवादाला थारा न देता नेहमीच विकासकामे करणाऱ्यालाच साथ दिली हा इतिहास आहे.आणि यापुढेही जनता विकास करणाऱ्यालाच साथ देईल असा मला ठाम विश्वास आहे. आचारसंहितेत बहिणींच्या खात्यात पगार जमा करण्यास अडथळे येऊ नये यासाठी दोन महिन्यांचा पगार अगोदरच बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महायुती सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आहे. लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आशा सेविका, पोलीस पाटील, कोतवाल यांच्या मानधनात भरघोस वाढ असे लोककल्याणकारी निर्णय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घेतले. कोणत्याही सरकाने आजपर्यंत लाडक्या बहिणींचा सन्मान केला नाही तो महायुती सरकारने केलाआहे. हा तुमचा भाऊ अडिअडचणीत कायम तुमच्यासाठी तत्पर राहील विश्वास देऊन उपस्थित बहिणींना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो बहिणींची उपस्थिती होती.