पिंपळनेर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा
उपक्रमांतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनींची मानवी साखळी तयार करून दिला स्वच्छतेचा संदेश.
पिंपळनेर,दि.30(अंबादास बेनुस्कर) येथील आ.मा.पाटील कला,वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान महाविद्यालय पिंपळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने 'स्वच्छता ही सेवा 2024' चा एक भाग म्हणून मानवी (विद्यार्थी-विद्यार्थिनी) साखळी तयार केली. विद्यापीठाच्या व केंद्र शासनाच्या आदेशान्वये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत चालणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता उपक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या साखळीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पवार,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी,सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन सोनवणे,सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय तोरवणे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ.बी.सी.मोरे,प्रा.डॉ.सतीश मस्के,डॉ.वाय.एम.नांद्रे,प्रा.सी.एन.घरटे,डॉ.ए.जी. खरात, विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला यावेळी प्राचार्य डॉ.एल.बी.पवार म्हणाले की हा कार्यक्रम या वर्षाच्या मोहिमेचा एक भाग आहे, ज्याचा समारोप महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी, म्हणजे 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छ भारत दिवसासह होईल.आजचा एनएसएस चा उपक्रम हा स्वच्छतेचा व ऐकतेचा सुंदर संदेश आहें. सहभागी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी यांनी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याची शपथ दिली.डॉ.नितीन सोनवणे यांनी स्वच्छ भरता विषयीच्या घोषणा दिल्या.आभार डॉ.संजय तोरवणे यांनी मानले.फोटो ओळी -पिंपळनेर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनींची मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला.याप्रसंगी प्राचार्य, व प्राध्यापक वर्ग.