सोडा विक्रीसाठी चार हजार रूपये लाच घेतांना पोलीस कर्मचारी एल सी बी जाळ्यात.
धुळे, दि. १६(गोकुळ देवरे) सोडा विक्री करू देण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या धुळ्यातील पोलीस हवालदार एजाज काझी (वय ५२) यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना घडली.यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली
या बाबत वृत्त असे की देवपूर पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार हा ओमनी वाहनवर सोडा विक्री करतो.सोडा विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी व कोणतीही कायदेशीर कारवाई होवू न देण्यासाठी हवालदार एजाज काझी यांनी चार हजार रुपयेची लाच मागीतली.याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी सापळा रचून देवपूर पोलीस स्टेशनला चार हजारांची लाच घेतांना हवालदार काझी याला अटक करण्यात आली. व त्याच्या विरोधात देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,वाचक पोलीस निरिक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे सापळा अधिकारी पोनि.अमोल वालझडे, सापळा पथक पो.हवालदार प्रभाकर गवळी,पो.काॅ.सुरेश चव्हाण सर्व नाशिक युनिट यांनी कार्यवाही केली.