ढोरकीन शिवारातील एका शेतामध्ये गांजाचे झाड लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई* पैठण प्रतिनिधी हारून शेख 


पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवारातील एका शेतामध्ये गांजाचे झाड लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.


त्यानंतर आज दुपारी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी महसूल व पोलीस पथकासह छापा मारून मच्छिंद्र रावसाहेब मुळे यांच्या शेतीतील २८ किलो २२ गांजाची झाडे जप्त केली. अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र रावसाहेब मुळे यांचे शेती गट क्रमांक ळ१२५/१ यामध्ये गांजा झाडाची लागवड केल्याची गोपनीय खबर प्राप्त झाली होती त्यानंतर तात्काल उपविभागी पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी माहिती देऊन सपोनि ईश्वर जगदाळे व पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी आपला रचून शासकीय पंचासह महसूल पुरवठा विभागाचे निरीक्षक कैलास बहुरे, तलाठी सोनवणे, पोलीस ऑफ निरीक्षक संभाजी झिंजुर्डे पोलीस जमादार राजेश चव्हाण, करतातसिग सिंगल, गणेश खंडागळे, सोनवणे, दाभाडे, उगले, घोडके यांच्यासोबत शेतात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी गांजाचे झाडे आढळून आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new