कॉपर केबल चोरट्यांची टोळी जेरबंद;निजामपूर पोलिसांची कामगिरी,एक लाखाचा माल हस्तगत पिंपळनेर,दि.31(अंबादास बेनुस्कर)


कॉपर केबल चोरट्यांची टोळी  जेरबंद;निजामपूर पोलिसांची कामगिरी,एक लाखाचा माल हस्तगत

पिंपळनेर,दि.31(अंबादास बेनुस्कर)

साक्री तालुक्यातील निजामपूर हद्दीतील सोलर कंपनीच्या कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले.टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यांच्याकडून 1 लाख 9 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

निजामपुर पोलीस ठाणे हद्दीतील सालटेक गाव शिवारातील गेल सोलर कंपनीच्या कंपाऊंडमधील ब्लॉक क्र.48 मधील 69 हजार रुपये किंमतीची कॉपर केबल चोरट्यांनी लंपास केली.मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही चोरी झाली.याप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच सपोनि मयुर भामरे यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत देविदास बंडु थोरात(रा.रायपुर ता. साक्री),देविदास वेडु वाघमोडे,रविंद्र धवळु कारंडे, ज्ञानेश्वर दामू कारंडे व बापु लहानु कारंडे सर्व(रा.धमनार ता.साक्री)यांना ताब्याताहन घेतले.त्यांच्याकडुन गुन्ह्यातील कॉपर केबल वायर,गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी व लोखंडी कटर असे एकुण 1 लाख 9 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधीकारी एस.आर.बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस ठाण्याचे सपोनि मयुर भामरे,पोसई प्रदिप सोनवणे,यशवंत भामरे, मधुकर सोमासे,पोहेका रतन मोरे,प्रदिप आखाडे,पोना खंडेराव पवार,पोका परमेश्वर चव्हाण,प्रविण पवार,श्रीराम पदमर,फुलसिंग वसावे, पृथ्वीराज शिंदे,अमरसिंग पवार यांच्या पथकाने केली.

या पाच जणांच्या टोळीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे-सपोनी मयुर भामरे निजामपूर 

छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new