नाडसे येथील सरपंचावर चाकू हल्ला;21 हजारांची रोकडसह हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील चेन असा मुद्देमाल लंपास


नाडसे येथील सरपंचावर चाकू हल्ला;21 हजारांची रोकडसह हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील चेन असा मुद्देमाल लंपास 


पिंपळनेर,दि.14अंबादास बेनुस्कर) साक्री तालुक्यातील मालपूर-कासारे गावाच्या फाट्याजवळ दुपारी नाडसे गावच्या सरपंचाचा रस्ता अडवीत जमावातील एकाने चाकू हल्ला केला.या चाकू हल्ल्यात सरपंच जखमी झाले.या झटापटीत सरपंचाकडील 21 हजार रूपयांच्या रोकडसह सोन्याची चेन व अंगठ्या गहाळ झाल्या.सरपंच विजय निंबा भामरे (55),रा.नाडसे,ह.मु. संभाजीनगर,साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी वाजेच्या सुमारास एम.एच.42 के.1976 क्रमांकाच्या कारने मालपूर-कासारे फाट्यावरून जात असतांना या ठिकाणी 15 ते 20 जणांचा जमाव उभा होता.या जमावातील निलेश भाऊसाहेब भामरे,भाऊसाहेब सुकदेव भामरे,मधुकर यशवंत नेरकर तिघे रा.नाडसे यांनी कारचा दरवाजा ओढून बाहेर काढले.त्यानंतर भाऊसाहेब भामरे याने उजव्या पायावर लोखंडी रॉडने वार केला. निलेश भामरे याने त्याच्या हातातील चाकूने वार केला. चाकुचा वार चुकवीतांना तो उजव्या हाताच्या करंगळीला लागल्याने जखम झाली. मधुकर नेरकर व इतर इसमांनी बेदम मारहाण केली. दरम्यान,भाऊसाहेब भामरे याने निलेश भामरेला चाकुचा वार करण्यास प्रवृत्त करीत होता.लोकांची गर्दी जमा झाल्याने हल्लेखोरांनी तुला व तुझ्या मुलाला साक्रीत घरी येवून मारू,अशी धमकी देत पसार झाले.दरम्यान,पोलिसांचे वाहन या ठिकाणी आले असता त्यात बसून पोलीस स्टेशनला आलो.त्यानंतर साक्री शहरातील दीनदयाळ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झालो.या झटापटीत 21 हजारांची रोकड,हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील चेन असा मुद्देमाल गहाळ झाला.या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात निलेश भाऊसाहेब भामरे,भाऊसाहेब सुखदेव भामरे,मधुकर यशवंत नेरकर तिघे रा.नाडसे,ता. साक्री यांचेवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तपास पोसई साळुंके करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new