साक्री मतदार संघातील पिंपळनेर नगरपरीषद हद्दीत 18 रस्त्यांच्या कामांचे उजळले भाग्य;आ.मंजुळा गावीत यांच्या हस्ते 74 कोटी रुपये खर्चाच्या कामांचे भूमीपूजन, उद्घाटन
पिंपळनेर,दि.14(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुका विधानसभेच्या आमदार मंजुळा गावीत यांनी पिंपळनेर शहरातील विविध कॉलनी परीसरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणी गटारी या 18 कामांचा शुभारंभ केला, या प्रसंगी शिवसेनाप्रमुख डॉ. तुळशिराम गावीत यांचेसह शिवसेनेचे वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.नवनिर्मीत पिंपळनेरनगरपरीषदेस 70 कोटी रुपयांचा भरघोस निधी ररते आणी गटारी यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून मंजूर करुन घेतला,नगरपरीषदेचे कामकाज सुरु झाल्यापासून रस्त्यांच्या व गटारीच्या कामांसाठी हा पहिल्या टप्यातील निधी आहे.या पुढेही पिंपळनेर हद्दीतील नवीन वसाहतींसाठी निधी उपलब्ध करुन घेतला जाईल.एकही कॉलनी लहान-मोठ्या गल्ल्या,रस्ते आणी गटारींपासून वंचित राहणार नाही.या मंजूर निधीतून विद्यानगर,अलंकापुरी नगर, सावीत्रीबाई कॉलनी,महात्मा फुले कॉलनी,मंगलमुर्ती नगर, स्वामी समर्थ नगर,एखंडे गल्ली,गोपाळ नगर,होळी चौक,मदनी नगर,जेबापूर रोडवरील काही वसाहती, नाना चौक,इंदीरानगर,सुभाष चौक व इतर परिसरात 70 कोटी रुपयांच्या निधीतून सर्व सिमेंट कॉंक्रेटचे रस्ते व गटारी होणार आहेत.
या सर्व कामांचे भूमीपुजन आ.मंजुळा गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.या भुमीपुजन कार्यक्रम प्रसंगी नगरपरीषदेचे प्रशासक तथा मुख्याधीकारी दिपक पाटील,न.प.इंजि.श्री.लाडे, शिवसेना गटाचे जिल्हा ऍड.एखंडे,समूह प्रमुख संभाजी अहिरराव,युवानेते इंजी.सागर गावीत,गोविंदराव एखंडे,अर्जुन एखंडे,शिलनाथ अखंडे,बबलू शेख,राजेंद्र पगारे,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बबलू चौधरी,अल्पसंख्याक प्रमुख अबिद शेख,विभाग प्रमुख अमित सूर्यवंशी,बबलू शेख,अमित सूर्यवंशी,जितु कुवर,भाजपाचे राजेंद्र पगारे,प्रकाश एखंडे,राजेंद्र शिरसाठ, रिखबचंद जैन,वसंत चौधरी,शेखर बागुल,नितीन राणे,अरुण निकुम,भैया घाणेकर,एम.पी.सोनवणे, संभाजी ढोले,संदिप शिंदे,शाम दशपूते,रवींद्र सूर्यवंशी,पंकज भावसार,मोतिलाल पोतदार,मैफुज सैय्यद,जिभाऊ घरटे,रवी सोनवणे,ह.भ.प.विजय महाराज काळे,डॉ कादरी साबुद्दीन,तौसिफ मनियार,मुशाहिद शेख,रोशन पिंजारी,असलम सय्यद, नितीन नगरकर,रियाज बापू सूर्यवंशी,पठाण,कैलास सूर्यवंशी,मुस्ताक शेख,आयुब पठाण,नाजिम पठाण,साजिद पटवे,दिनेश आढे,एस.आर.भदाणे,सुभाष नेरकर,अनिल मुसळे,जेटी नगरकर,भालचंद्र सूर्यवंशी,राजेंद्र जाधव,हरिष सूर्यवंशी,शिरिष कुंवर, विजय सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने पिंपळनेर परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.पिंपळनेर शहर हद्दीतून वाहनाऱ्या पांझरा नदीवर पुर्व आणी पश्चीम बाजूस 4 कोटी रुपयांची संरक्षक भिंत बांधण्यात येणार सुकापुरला 132किव्हीचे उपकेंद्र*
पिंपळनेर पासून 7 कि. मि.अंतरावरील सुकापुर येथे उपकेंद्र मंजूर असून येत्या पंधरा दिवसांत उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आ.मंजुळा गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.