11 व्या राज्यस्तरीय तेंग -सु-डो क्रीडा स्पर्धेत राजे छत्रपती स्कूलच्या खेळाडूंची दमदार कामगीरी;

11 व्या राज्यस्तरीय तेंग -सु-डो क्रीडा स्पर्धेत राजे छत्रपती स्कूलच्या खेळाडूंची दमदार कामगीरी;


धुळे जिल्ह्याच्या खेळाडूंनी पटकावली राज्यात द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी

पिंपळनेर,दि.1(अंबादास बेनुस्कर)शिर्डी येथील साई सिल्वर ओक लॉन्स येथे संपन्न झालेल्या अकराव्या राज्यस्तरीय तेंग सू डो क्रीडा स्पर्धेत पिंपळनेर येथील राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी केली.

जिल्ह्यातून एकूण 43 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.7 सुवर्णपदक,13 रौप्य पदक व 23 कास्य पदक मिळवत धुळे जिल्ह्याने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकाविला.

*विजयी झालेले खेळाडू*

*सुवर्णपदक विजेता* 

सोनम बागुल,कृष्णा कुंभार,सिद्धीका पाटील,श्याम पाटील,आशिष उंबरे,प्रशांत वसावे,प्रेम पवार,

*सिल्व्हर पदक विजेते*

मनस्वी,मयुरी ठाकरे,सचिन पाटील,सुमित जगताप,अतुल सूळ,विवेक पटले,

ओम पाटील,चंद्रकांत शेलार,कुंदन बागुल,स्वामी पवार,साजन चौरे,विजय भटू बिल,यश वळवी

*कास्यपदक विजेता*

छकुली गोयकर,यश गांगुर्डे,देव जाधव,वेदांत साबळे,गोकुळ चौरे,चेतन पाटील,जयेश उंबरे, प्रणव पाटील,प्रशांत सूळ,पृथ्वीराज गवळी,कर्तव्य गांगुर्डे,निलेश जगताप,हिमांशू पाटील,जयदीप गिरासे,ऋष्या अहिरे,भावेश पाटील,सुधांशू पाटील,उमेश पाटील,कुणाल माळी,देवांग पाडवी,पियुष अहिरे,तुषार साबळे,गार्गी पाटील या सर्व विजय झालेल्या खेळाडूंचे महाराष्ट्र तेंग सू डो संघटनेचे अध्यक्ष मास्टर रॉकी डिसूजा महासचिव मास्टर सुभाष मोहिते आयोजक चंद्रकांत राहिंज नासिक विभागीय टेंग सू डो प्रमुख संभाजी अहिरराव सर, नासिक जिल्हाप्रमुख भडांगे नंदुरबार जिल्हा प्रमुख बैसाणे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

तसेच संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष संभाजी अहिरराव,उपाध्यक्ष श्याम कोठावदे,सचिव रा.ना.पाटील,संचालक जगदीश ओझरकर,अनिल बागुल,सुनील अहिरराव,शेखर बागुल,मुख्याध्यापिका सोनाली पाटील शिक्षक व कर्मचारी वृंद,तसेच पालक वर्ग यांनी सर्व विजयी झालेल्या खेळाडूंचे कौतुक केले.

विजय झालेल्या खेळाडूंना संभाजी अहिरराव अमोल अहिरे,बाळासाहेब गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.


छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new