मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर (MGVS) अंतर्गत लिंक वर्कर्स प्रकल्प, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष
(DAPCU), संस्थेचे अध्यक्ष मा. मनसुख झांबड साहेब, मा. आप्पासाहेब उगले सर (प्रकल्प संचालक) यांच्या नियोजनाने व श्रीमती अन्नपूर्णा ढोरे मॅडम (DRP) यांच्या नेतृत्वाखाली शाहीर अशोक बागुल यांचा लोककलापथकाच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स जाणिव जागृतीचा कार्यक्रम अंधारी व केऱ्हाळा /पालोद /अजिंठा या गावी घेण्यात आला. शाहीर अशोक बागुल यांच्या लोककलापथकाच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स विषयावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला समुपदेशक मंगेश कांबळे यांनी देखील. एचआयव्ही ची मुख्य कारणे सांगण्यात आली. गुप्तरोगावर माहिती देण्यात आली. एचआयव्ही पासून कसे दूर राहता येईल हे शाहीर यांनी खुप छान लोककलापथकातून सांगितले. यावेळी जनते मधून खुप चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान शाहीर अशोक बागुल, नवनाथ वाघ, कडू खंडू पवार, रामदास साळवे, किरण गिरी, प्रभाकर गायकवाड, रतन गायकवाड, विशाल आरसुड पुजा पुरी अरुण चव्हाण (लिंक वर्कर), विशाल पडवळ (सुपरवायजर) हे उपस्थित होते.