पिंपळनेर येथे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा
पिंपळनेर,दि.3(अंबादास बेनुस्कर)
तालुक्यातील पिंपळनेर येथे सोमवारी पोळा सण अतिशय उत्साहात,शांततेत व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.भारत हा कृषिप्रधान देश असून ही ओळख निर्माण करणाऱ्या बळीराजाचा कष्टकरी साथीदार म्हणजे त्याची बैलजोडी ही होय.स्वाभिमान अभिमान आणि विश्वास या गुणांमुळे शेती प्रधान भागाला सर्वांना आवडणारा बैलपोळा सण बैलाच्या कष्टाची व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण शेतकरी वर्ग अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.काळ्या मातीत वर्षभर काम करणाऱ्या सर्जा राजा मशागतीतुन आपल्या मालकाला भरघोस उत्पन्न मिळवून देतो त्याच्या कामाच्या कृतज्ञतेसाठी पोळा सणाच्या दिवशी शेतकरी सकाळी शेतात किंवा नदीवर आपआपल्या सर्जा राजांची स्वच्छ पाण्याने अंघोळ करून त्याला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे दिवसभर कुठलेही काम न लावता संपूर्ण दिवसभर पोटभर चारा देऊन दुपारी बाजारातन बैलांसाठी नवीन दोर,नाथ,शिर मोरखी, घुंगरू,घाटी तसेच उत्कृष्ट सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारातून विकत घेतो.सर्जा राजांच्या शिंगांना शामी बसून रंगांनी उत्कृष्ट पद्धतीने सजवतो.आपली जोडी कशी उत्कृष्ट सजावट करता येईल यासाठी बळीराजा प्रयत्नाची पराकाष्ठका करतो. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंब आपल्या मुलांना पोळ्याच्या दिवशी घरी बोलवतात व परिवारासह पोळा सण उत्साहात साजरा करतात.गावात दुपारी चार वाजेपासून पोळा उत्सवाला सुरुवात करण्यात आली. गावातील ग्रामदैवत मारुती मंदिरापासून ग्रामस्थांनी वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे गावातून बैलजोडींना फिरविण्यात आले.प्रत्येक शेतकऱ्याने आपआपल्या घरी बैल जोडीला गोड पुरणपोळी खाऊ घातली.महीला भगिनींनी सर्जा-राजाचे पूजन केले.त्यानंतर सर्जा-राजासाठी धरलेला उपवास बळीराजाने सोडला.त्यानंतर परत आपल्या गोठ्यामध्ये सर्जा-राजाला हिरवं वैरण पोट भरून खाऊ घालतात.सायंकाळी बैलाचे पूजन करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. पोळा उत्साह दरम्यान गावात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.शांतता प्रिय उत्सव साजरा करून गावकऱ्यांनी पिंपळनेर गाव शांतता प्रिय व एकतेचे प्रतीक असल्याचे गावकऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले*
सपोनी किरण बर्गे पिंपळनेर पोलिस स्टेशन