कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे आज अन्याय दिवस

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे आज अन्याय दिवस



पिंपळनेर,दि.5(अंबादास बेनुस्कर)

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने आज दि.5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा अन्याय दिवस म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या या अनेक वर्षापासून प्रलंबित असून त्याबाबत शिक्षण मंत्री महोदयाकडून वारंवार आश्वासन देऊनही त्या मागण्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारानुसार यावर्षी शिक्षक  दिनावर बहिष्कार टाकत अन्याय दिवस म्हणून आंदोलन करण्याचे निर्णय घेण्यात आला.पिंपळनेर तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने अन्याय दिवस आंदोलनात सहभाग घेत पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी पिंपळनेर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.सचिन शिंदे जिल्हा सचिव प्रा.जी.एस. सूर्यवंशी,तालुका सचिव प्रा.पी एल गोळकर,एस.टी पाटील,उपाध्यक्ष प्रा.अविनाश पाटील,प्रा.भामरे,प्रा.अमोल देवरे प्रा.इम्रान पठाण प्रा.निलेश मानकर प्रा.धनंजय बर्डे,प्राध्यापिका एस बी माळी प्रा.बी.एच.बागुल प्रा.महेश नंदन,प्रा.एस शिंपी,प्रा.एबी.महाले.प्रा. एल.एम.पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new