जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांना ही आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे; शेख अब्दुल रहीम
जिल्हा शिक्षण विभागाने निवेदनाची दखल घेऊन या वर्षीपासूनच खाजगी शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा; महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनची मागणी!छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन महाराष्ट्र राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडे मागणी केली आहे की `जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्याच्या हेतुने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करते. मनपा शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्याच्या हेतू उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना महानगर पालिका प्रशासन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते परंतु खाजगी शाळेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांची जिल्हा प्रशासन कोणतीही दखल घेत नाही म्हणून' जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे दरवर्षी जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन जिल्हा परिषद शिक्षकाप्रमाणे खाजगी शाळेतील उर्दू अणि माध्यमातील शिक्षकांनाही जिल्हा स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे` अशी कळकळीची विनंती. कारण ज्ञानदानाचे पवित्र कार्य खाजगी शाळेतील शिक्षकही उत्कृष्टपणे कार्य करत आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर प्रशासनाने कमीत कमी तालुका स्तरावरून एक उर्दू अणि एक मराठी खाजगी शाळेतील शिक्षकांची निवड करण्यात यावी. जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या सत्कारामुळे शिक्षकांना आणखी उत्साहाने कार्य करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल. आमच्या निवेदनाची दखल घेऊन यावर्षी पासूनच सुरुवात झाली तर खाजगी शाळांतील शिक्षकांचा आनंद द्विगुणित होईल. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक श्रीमती जयश्री चव्हाण मॅम यांना प्रत्यक्ष भेटून व सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतीश सातव साहेब यांना ही प्रत्यक्ष निवेदन सादर करण्यात आले..चौकट
"मनपा शाळेतील शिक्षकांची कार्याची दखल महानगर पालिका प्रशासन घेते, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कार्याची दखल जिल्हा परिषद प्रशासन घेते तर जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या कार्याची दखल कोण्ही का घेत नाही? खाजगी शाळेतील शिक्षकांचा कोण्ही वाली नाही का? असा प्रश्न मला पडत आहे म्हणून ही मागणी केली आहे.."
शेख अब्दुल रहीम ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शेख नईम सिल्लोड
राज्य प्रवक्ता: महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन
संस्थापक अध्यक्ष: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन