घोडेगाव ता.चाळीसगाव भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*भाजपला पुन्हा दे धक्का*

*घोडेगाव ता.चाळीसगाव भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*भाजपला पुन्हा दे धक्का*



 *घोडेगाव येथील भाजप कार्यकर्त्यांचे दुसऱ्या टप्प्यात शेकडो प्रवेश*बंजारा युवकांचा निर्धार चाळीसगाव तालुक्यावरील विघ्न दूर करण्याचा केला संकल्प*

( युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक ) चाळीसगाव - गेल्या दहा वर्षात बंजारा समाजाच्या शेवटच्या घटकाची सेवा केली आहे. जय सेवालाल म्हणत तांडा वस्तीच्या भरभराटीसाठी प्रामाणिक काम केले. यापुढे देखील बंजारा समाजातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझी धडपड सुरू राहील.आज घोडेगाव येथील तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी  शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांचे मनापासून स्वागत करतो.अशी भावना मा. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.आज घोडेगाव ता. चाळीसगाव येथील शेकडो बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी बंजारा समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते, तथा भटक्या सेना तालुकाप्रमुख अनिल चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला.त्यांचा माजी खासदार उन्मेशदादा पाटील, बंजारा नेते मोरसिंगभाई राठोड, उपशहरप्रमुख महेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अंकूश चव्हाण,पंचायत समितीचे सभापती सुनील पाटील, माजी सदस्य रवीभाऊ चौधरी,अमित सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.मा.खासदार उन्मेशदादा यांच्या नेतृत्वाखाली येत्या निवडणुकीत परीवर्तन घडवून आणण्यासाठी आपण सज्ज राहवे अशी भावना युवा कार्यकर्ते रामेश्वर राठोड यांनी मनोगतात व्यक्त केले.बंजारा युवकांचा निर्धार चाळीसगाव तालुक्यावरील विघ्न दूर करण्याचा केला संकल्प*याप्रसंगी बंजारा समाजाचे नेते मोरसिंगभाई राठोड यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले उन्मेशदादा यांनी सतत बंजारा समाजाला विकासाचे झुकते माप दिले आहे. त्यांनी शिवसेनेची धगधगती मशाल हाती घेतली आहे.त्यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून बंजारा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला शिवसेना नेते उन्मेश  पाटील यांच्या सोबत काम करण्यासाठी जोडू. आता बंजारा समाजाच्या युवकांनी चाळीसगाव तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प केला आहे.अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते रामेश्वर राठोड, विलास राठोड, अमोल गायकवाड, विक्रम जाधव,श्रीनाथ जाधव, वाडीलाल राठोड, रामेश्वर रंगनाथ राठोड, रामेश्वर नामदेव राठोड, रवींद्र गंगाराम जाधव, नितीन चव्हाण, रामेश्वर विजय राठोड, रामेश्वर गब्रू राठोड, रमेश राठोड, रूपचंद जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.त्यांचे उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new