कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील दोन वर्षी साई कडुबा बोरसे हे वाहून गेला.
कदीर पटेल.
*आज घाटशेंद्रा येथे मुसळधार पाऊस झाला काही क्षणातच गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली शेतीला धरणाचे स्वरूप आले आणि शेतकऱ्यांचे दरवर्षीप्रमाणेच नुकसानीची व संकटांची मालिका सुरूच राहिली.. ह्या पावसामध्ये दोन वर्षाचा साई कडूबा बोरसे हा बालक वाहून गेला अत्यंत वाईट अशी घटना गावामध्ये घडली.. दोन बहिणीच्या पाठीवर अत्यंत नवसाचा असलेला साई आज पोळ्याच्या सणाच्या दिवशी आपल्या कुटुंबातून निघून गेला.. नियतीने काही क्षणातच होत्याचे नव्हते केले.. कुटुंब व आजूबाजूच्या लोकांनी शोध मोहीम सुरू केली वआपल्या घरापासून जवळपास 100 मीटरच्या अंतरावर लिंबाच्या झाडाच्या मुळ्यांमध्ये साई अडकला व सापडला.. परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला होता.. ईश्वर कुटुंबाला ही दुःख पेलण्याची शक्ती देवो ही ईश्वरा चरणी प्रार्थना करतो.. आणि पाणी पावसाचे दिवस आहे शेतातून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे.. बालक साई तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना