साक्री तालुक्यातील रोहोड परिसरातील शेकडो महिलांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
पिंपळनेर,दि.23(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)रोहोड ता.साक्री येथे झालेल्या महिला मेळाव्यात आ.मंजुळा गावित यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला.याप्रवेशाचे वेळी आ.मंजुळा गावित यांनी सांगीतले की,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.शिवसेना पक्षाने आजवर सर्वसामान्य नागरिकांच्या विशेषतःमहिला भगिनींच्या हिताच्या योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या आहेत.त्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना,माझी लाडकी बहीण योजना,गरोदर मातांसाठी पोषण आहार, प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल बांधण्यासाठी महिलांना प्राधान्य,संजय गाधी निराधार योजना अशा अनेक योजना राज्य शासन महिलांसाठी राबवित आहे. पक्षवाढीसाठी आपण सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे रहावे.प्रत्येक महिलेने किमान 50 ते 75 सभासदांची नोंदणी करणेसाठी वेळ द्यावा व शिवसेना पक्षाचे सभासद नोंदवून घ्यावेत असे अवाहन पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिलांना केले.या प्रसंगी दहिवेलच्या रंजना सुनिल बच्छाव यांचेवर शिवसेना तालुका प्रमुख महिला आघाडी साक्रीच्या पश्चिम भागाची जबाबदारी सोपविण्यात आली.तर रोहोड च्या सुनिता रमेश सुर्यवंशी यांचेवर शिवसेना तालुका महिला संघटीका साक्री च्या पश्चिम भागाची जबाबदारी सोपविण्यात आली.दोन्हीही महिलांना नियुक्तीचे पत्र या कार्यक्रमात आ.मंजुळा गावित यांचे हस्ते सोपविण्यात आले.व त्यांचा शिवसेना पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.आमच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडु व पक्षवाढीसाठी,सभासद नोंदणीसाठी प्रयत्न करु असे श्रीमती रंजना बच्छाव व सुनिता रमेश सुर्यवंशी यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगीतले.याप्रसंगी श्रीमती छायाबाई पंडीत साबळे,चंद्रकला छोटूराम पवार,अनिता रमेश पवार,मिठा चमारु चौरे,रंजना संदिप साबळे,सुनिता पवार,सायजाबाई राजु पवार, प्रमिला सुरेश सुर्यवंशी, चंद्रकला दिनेश देवरे या प्रमुख महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे यशवंत शांताराम जगताप,बाळु जगन साबळे, राजाराम साबळे,अशोक पुंडलिक ठाकरे,जेजीराम जगन साबळे,रमेश श्रावण सुर्यवंशी,वंदन कर्मा ठाकरे, गजमल मोतीराम सुर्यवंशी, किरण श्रावण जगताप,डोंगरु रामा सुर्यवंशी यांचेसह शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.छाया:अंबादास बेनुस्कर