कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्वाचे-सपोनी मयुर भामरे
पिंपळनेर,दि.3(अंबादास बेनुस्कर)कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य देखील तेवढेच महत्वाचे आहे,असे प्रतिपादन निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि मयुर भामरे यांनी केले.जैताणे येथील ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाली.प्रसंगी सपोनी मयुर भामरे यांनी ग्रामस्थांना वाढती गुन्हेगारी,कायदा सुव्यवस्थे विषयी माहिती दिली.गावात चोरीवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे चौकाचौकात बसवावे.संशयीत व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवणे तसेच परिसरात बोगस खत, बियाण्याचे जाळे पसरले आहे. ती आपण मोडीत काढूच परंतू शेतकरी बांधवांनी देखील बी बियाणे,खतांविषयी माहिती घेवून,खात्री करूनच ते खरेदी करावे,असे आवाहन केले. गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेसह शारीरीक फिटनेसकडे लक्ष द्यावे.कोणी संकटाच असल्यास डायल 112 मदत मागू शकतो.विद्यार्थी व मुलींना कोणी त्रास देत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा.तुम्ही देखील सक्षम व्हावे,असे आवाहन यावेळी भामरे यांनी केले.यावेळी सरपंच कविता मुंजगे,उपसरपंच बाजीराव पगारे,ग्रा.पं.सदस्य राजेश बागूल,पोपट न्याहाळदे,गणेश न्याहाळदे,मनियार सत्तार,समाधान महाले,राकेश शेवाळे,नंदकुमार जाधव,ग्रामसेवक अनिल राठोड,लिपीक यादव भदाणे,डॉ.गावित,कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.