सार्वजनिक गणेशउत्सवा निमित्त शेवगांव पोलिस स्टेशन ला गणेश मंडळाचे कार्यकर्ते शांतात
कमिटी आणि पत्रकार पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक संपन्न !!!*
युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक.
9763265211
या बाबत सविस्तर वृत्त असे की सार्वजनिक गणेश उत्सवाच्या अनुषंगाने आज दि. 02/09/2024 रोजी सकाळी 10/45 वा. ते 12.05 वाजेच्या दरम्यान शेवगाव पोलीस स्टेशन हददीतील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी, प्रतिष्ठित नागरिक,वाद्य़धारक, यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये गणेश मंडळ यांनी गणेश मुर्तीची स्थापनेपूर्वी घ्यावयाची कायदेशीर परवानगी, मंडप जागा, विज कनेक्शन, स्वयंसेवक नेमणे, सी.सी.टीव्ही कॅमेरा लावणे व बॅनर बाबत नगरपरीषद ग्रामंपचायतचा नाहरकत दाखला घेणे, तसेच सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जनाचे सुचना तसेच मुर्तीची विंटबना होणार नाही बाबतची काळजी व सार्वजनिक मंडळाचा देखावा तयार करण्यापुर्वी जातीय व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याबाबतच्या सुचना तसेच सण उत्सव काळात सोशल मिडीयाचे माध्यमातुन कुठल्याही धर्मांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याबाबत सुचना व मार्गदर्शन गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांना करण्यात आले. व शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत शांतता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीस श्री.सुनिल पाटील उपविभागिय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग समाधान नागरे पोलिस निरीक्षक शेवगांव नगरपरीषदेचे ओ. एस. सुनिल पगारे, व महावितरण चे प्रभारी उप अभियंता विश्वास नरके, शहर अभियंता पगारे साहेब सार्वजनिक विभागाचे स्थापत्य़ साहाय्य़क अभिंयता सचिन देशमुख हजर होते. सदर मिंटीगसाठी शहर शांतता कमिटीचे अरुण पाटील लांडे संजय फडके सुनिलशेठ आहुजा कॉम्रेड संजय नांगरे मनीष बाहेती डॉ. नीरज लांडे सतीश मगर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख पत्रकार सुरेश बोरडे पाटील यांच्या सह शहरातील विविध मानाच्या गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह 65 ते 70 जनसमुदाय उपस्थित होता. डी.जे. वाद्य वाजवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे ताजा कलम*यावेळी बैठकीमध्ये गणेश मंडळाचे आचल लाटे कमलेश लांडगे नवनाथ कवडे मनोज कांबळे शैलेश बंब तुषार पुरनाळे राहुल सावंत या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक सदस्यांनी समस्या मांडल्या येत्या आठ दिवसांमध्ये त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले*युसुफ पठाण प्रथिनिधी मालेगाव नाशिक.