सपोनि ईश्वर जगदाळे यांचा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार.* *पैठण प्रतिनिधी/हारून शेख*

सपोनि ईश्वर जगदाळे यांचा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार.* *पैठण प्रतिनिधी/हारून शेख*



हिंदु धर्मियांत लहानापासून ते मोठ्यापर्यंत ज्यांच्या वर्षभरापासून आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात अश्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नऊ दिवसांच्या उत्सवा दरम्यान व विसर्जन मिरवणुकीच्या काळात,तसेच सर्व मुस्लीम समाज बांधवासाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या  ईद ए मिलाद या सणाच्या काळात पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गावागावांत दोन्हीं  महत्वपूर्ण सण सर्व नागरिकांनी जातीय सलोखा अबाधित राखत एकोप्याने मोठया उत्साहात व आनंदात साजरे करण्यात आले. या उत्साहाच्या दरम्यान पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावागावात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करत  ईद ए मिलाद व गणपती उत्सव व विसर्जन मिरवणुक सोहळा शांततेत व आनंदात पार पडले. या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस पाटील संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक चाबुकस्वार तसेच छ्त्रपती संभाजीनगर पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव बबनराव सुर्यनारायण,जिल्हा संघटक कडुबाळ चाबुकस्वार यांच्या प्रमूख उपस्थितीत पोलिस पाटील संघटनेच्या वतीने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.ईश्वर जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new