सह सचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश

सह सचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश 



पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या हस्ते हाती घेतला भगवा बांधले शिवबंधन: शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर होते हजर 

 ( युसुफ पठाण  प्रतिनिधी मालेगांव नासिक )

(9763265211)


शिव शाहू फुले आंबेडकर चळवळ व संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या विचार पेरणारे वारकरी संप्रदायाचा पाईक स्वे.से.नि.सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी आज दि.०३ सप्टेंबर २०२४ रोजी मातोश्रीवर शेकडो शिवसैनिक सोबत घेऊन पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते खांद्यावर भगवा घेऊन हाती शिवबंधन बांधून उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात जाहिर प्रवेश घेतला आहे. या वेळी बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्रभाऊ खेडेकर, बाळापुर विधान सभेचे आमदार नितिनबापू देशमुख, उपजिल्हाप्रमुख आशिष राहटे, छगनदादा मेहेत्रे,घाटाखालील जिल्हाध्यक्ष वसंतराव भोजणे  जिल्हा संघटक बद्रिभाऊ बोडखे, सिंदखेड राजा ता.अध्यक्ष महेंद्र पाटील, डॉ जानुजी मानकर, मेहकर नपचे माजी नगरअध्यक्ष अशोक अडेलकर, गजाननभाऊ मोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुमित सरदार, जिवन घायाळ, साहित्यिक रोहित म्हस्के, जिवन घायाळ,उर्मिलाताई ठाकरे, देऊळगाव माळी चे ए एन बळी, गजानन पालवे,यांच्यासह शेकडो शिवसैनिक हजर होते.सह सचिव सिद्धार्थ खरात यांनी नुकताच सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली असून मेहकर लोणार विधान सभा निवडणुक लढण्याची त्यांची इच्छा असल्याचे कळते तर शेतकरी, शेतमजूर , शोषित पिडीत कष्टकरी गाव खेड्यातील वंचित घटकाला न्याय, शेतमालाला भाव, तरुण युवकांना रोजगार आणि शिव,शाहू , फुले आंबेडकर चळवळ व वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यावर भर देऊन आचार. विचार,संस्कार व प्रत्यक्ष कृतीवर भर देणार असल्याचे खरात यांच्या कार्यशैलीतून दिसून येते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new