*'संबंध' परिचय मेळाव्याच्या प्रचार रथाचे व कार्यालयाचे उद्घाटन.*
( युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक)*
२६ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या माळी समाज युवक युवती 'संबंध' परिचय मेळाव्याच्या प्रचार रथाचे व कार्यालयाचे उद्घाटन रविवार दि. ८/९/२०२४ रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय, जुना आरटीओ रोड, अकोला येथे पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संगीताताई अढाऊ ह्या होत्या तर प्रचार रथाचे उद्घाटक डॉ. संतोष हुशे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून जयंतराव मसने होते
जिल्हा परिषद अध्यक्षा संगिताताई अढाऊ यांनी एकजुटीने काम केले तर मेळावा यशस्वी होतोच व समाज पुढे जातो, असा संदेश दिला तर डॉ. हुशे सर यांनी समाजासाठी देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असावी, आपण देत राहिलो की आपल्याकडे आपोआप येते असा संदेश दिला .यावर्षीचे संबंध परिचय मेळाव्याचे अध्यक्ष आशिष ढोमणे यांनी विवाह मेळाव्यासोबतच उद्योजक मेळाव्याची आवश्यकता असल्याचे सांगीतले.प्रचार रथाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून दिपक बोचरे यांची शिवसेना - उबाठा च्या राज्य उपसचिवपदी निवड झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले संगीताताई आढाऊ यांची वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले यावर्षीच्या मेळाव्याचे अध्यक्ष आशिष ढोमणे व मेळाव्याचे सचिव प्रा रमेश भड दोघांचेही सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.यासोबतच शारदाताई धनोकार,मायाताई ईरतकर, एड्. करुले, एड्. अमोल क्षीरसागर, जगन्नाथ रोठे, गजाननराव दुधाळे, उमेश मसने या सर्वांनी मेळाव्याला शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष रामदास खंडारे, सचिव बाळकृष्ण काळपांडे, पांडूरंग निमकंडे, प्रभाकरराव बोळे, नंदकिशोर बहादुरे, गजाननराव वाघमारे, सुमित्राताई निमकंडे, प्रविण वाघमारे, लक्ष्मण निखाडे, विद्याताई घाटोळ, प्रा.श्रीराम पालकर, डाॅ. प्रकाश वानखडे, अण्णा ढोमणे,सुनील उंबरकर ज्ञानेश्वर बोदडे गणेश बोबडे अशोक भराडआदिसह शंभरपेक्षा जास्त मेळाव्याचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश भड यांनी तर आभार प्रदर्शन केशवराव नागापुरे यांनी केले