वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्यावतीने शिक्षक दिन साजरा
पिंपळनेर,दि.7(अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्म.आ.मा.पाटील,कला वाणिज्य व कै.आण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्यावतीने शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एल.बी.पवार होते.सुरूवातीस त्यांनी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी.प्रा.एल.जे.गवळी यांनी केले.प्रमुख वक्ते.डाॅ.एन.बी.सोनवणे यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा घेतला.प्राचार्य, डाॅ.एल.बी.पवार शयांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डाॅ एस.एन.तोरवणे यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. सदर कार्यक्रमास डाॅ.बी.सी मोरे,प्रा.एम.व्ही बळसाने, डाॅ.एस.पी.खोडके, प्रा.सी.एन.घरटे, डाॅ.के.एन.वसावे, डाॅ.एस.एस.मस्के, डाॅ.वाय.एम.नांद्रे, डाॅ.ए.जी.खरात,प्रा.डी.बी.जाधव, प्रा.प्रथम सुर्यवंशी,प्रा.तोरवणे,प्रा. भूषण वाघ प्रा. विशाल देसले,प्रा.शुभम गौड, प्रा.श्रीमती गौड,प्रा.शुभम मोरे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी,राष्ट्रीय सेवायोजनेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते.