*डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी व्हा - अनिल वाघमारे*

*डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी व्हा - अनिल वाघमारे*


परळी / प्रतिनिधी


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार पुणे येथे येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळे बाबत जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक परळी वैजनाथ येथील व्हीआयपी विश्रामगृह संपन्न झाली. या बैठकीत डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी राज्यस्तरीय कार्यशाळे संदर्भात माहिती देत आपण आपल्या हितासाठी व यु ट्यूब चॅनल, पोर्टल च्या यशस्वी वाटचाली साठी ही राज्यस्तरीय कार्यशाळा किती महत्त्वाची आहे याची माहिती देण्याबरोबरच आपण व आपल्या सहकार्या सोबत सहभागी होऊन आपलं हित साध्य करावे असे आवाहन केले. 

याबाबत अधिक वृत्त असे की,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची राज्यभरातील डिजिटल मीडिया मध्ये जसे युट्युब, ब्लोगर, डिजिटल न्यूज पोर्टल, डिजिटल प्लॅटफॉर्म इत्यादी डिजिटल माध्यमातून   काम करणाऱ्या सर्व पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड पुणे येथे येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परळी येथे झालेल्या बीड जिल्हा आढावा बैठकीला बीड जिल्ह्यातील परळी,अंबाजोगाई,आष्टी,बीड,गेवराई, वडवणी आदी तालुक्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेच्या अनुषंगाने आजच्या डिजिटल युगात आपल्या यु ट्यूब व पोर्टल च्या माध्यमात काम करताना सर्वांनी संघटनात्मक दृष्ट्या एकत्र असणं किती आवश्यक आहे याची माहिती देण्याबरोबरच पुण्यात होणाऱ्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेची सखोल माहिती डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली. त्याचबरोबर डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ,कार्याध्यक्ष दिनकर शिंदे,उपाध्यक्ष संग्राम धन्वे, उपाध्यक्ष विश्वंभर मुळे,उपाध्यक्ष सय्यद बबलू यांनी देखील सर्वांनी कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले. दरम्यान या आढावा बैठकीनंतर अधिकाधिक संख्येने पुण्यात होणाऱ्या या कार्यशाळेला आम्ही परळीतून ही  मोठ्या संख्येने उपस्थित राहु असा विश्वास धनंजय आरबुने व तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे यांनी व्यक्त केला. सदर आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी परळी तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे मराठी पत्रकार परिषद समन्वयक धनंजय आरबुने, अमोल सूर्यवंशी पत्रकार भगवान साकसमुद्रे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new