*विविध क्षेत्रात काम करणारी संघटना पीपल्स फाउंडेशन - प्रमोद पाटील*
(यूसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक )*
*चाळीसगाव* - येथील पीपल्स सोशल फाउंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त नालंदा विद्यालय येथे शालेय साहित्य वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र जाधव मा. शिक्षण सभापती, उपनगराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक दीपक पाटील,डॉ.संदीप देशमुख,ॲड राहुल जाधव, ॲड निलेश निकम, योगेश पाटील, राकेश राखुंडे,पंडित रावते,ॲड विश्वजीत जगताप ,ॲड कविता जाधव, ॲड प्रेम निकम,ॲड इशरत खान, कार्यक्रमाची प्रास्ताविक पीपल्स फाउंडेशन अध्यक्ष ॲड आकाश पोळ यांनी केले फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम गेल्या दहा वर्षापासून सातत्याने करीत असुन शैक्षणिक, आरोग्य,सामाजिक प्रबोधन पर उपक्रम पीपल्स फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आले. शिक्षणाने समाज घडत असतो म्हणुन चांगले शिक्षणघ्या असे ॲड राहुल जाधव यांनी बोलत असताना मत व्यक्त केले पीपल्स फाउंडेशन सर्व जाती धर्मातील व सुशिक्षित तरुणांनी उभे केलेले संघटन असून अनेक समाजभिमुख उपक्रम गेल्या दहा वर्षापासून घेत आहे याचा साक्षीदार मी सुद्धा आहे असे रामचंद्र जाधव आपल्या भाषणात म्हणाले. विद्यालयातील तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या विद्यालयाचे व आपल्या कुटुंबाचे नावलौकिक करावे व विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी संघटना म्हणजे पीपल्स सोशल फाउंडेशन यापुढे देखील असेच उपक्रम या माध्यमातून सुरू ठेवावे असे अध्यक्षीय भाषणत प्रमोद पाटील म्हणाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष शिवसागर पाटील मुख्य संघटक शुभम महाजन, प्रणाल पवार, कुणाल पाटील,राकेश सरोदे, साहिल आव्हाड,श्रीकांत आव्हाड,भूषण पाटील,राकेश त्रिभुवन,भूषण मोघे,अंकुश चौधरी, अजिंक्य जाधव,तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केले