युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक )
9763265211*
*राहाता येथे पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन आज माजी ग्रामविकास मंत्री व विधानपरिषद सदस्या
मा. पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते व महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पा. साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ह्या कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.*याप्रसंगी कोविड काळात कर्तव्य बजावताना निधन झालेले जळगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी स्व. विजयजी साळुंके यांच्या पत्नी श्रीमती अर्चनाताई साळुंके यांना 50 लक्ष रुपये मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री. शिवाजीराव कर्डीले साहेब, माजी मंत्री मा.श्री. अण्णासाहेबजी म्हस्के साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा.सौ. शालिनीताई विखे, माजी खासदार मा.श्री. सुजयजी विखे, गौतम सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मा.श्री. बाबासाहेबजी कोते, अप्पर जिल्हाधिकारी मा.श्री. बाळासाहेबजी कोळेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. आशिषजी येरेकर, उपविभागीय अधिकारी श्री. माणिकजी आहेर, तहसीलदार श्री. अमोलजी मोरे, गटविकास अधिकारी श्री. जालिंदरजी पठारे, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, आजी - माजी पंचायत समिती सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.