सोयगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोयगाव तालुका अध्यक्षपदी भरत पगारे
जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद.
सोयगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत पगारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (राष्ट्रिय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर) सोयगाव तालुका अध्यक्षपदी प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी रविवारी (दी.१) नियुक्ती केली आहे.छ्त्रपती संभाजीनगर सुभेदारी विश्रगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षा प्रवेश सोहळा घेण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आर पी आय पक्षात प्रवेश घेतला.यावेळी संभाजीनगर पूर्व जिल्हा अध्यक्षपदी नानासाहेब म्हस्के यांची तर वैजापूर तालुका अध्यक्ष पदी रमेशभाऊ एकनाथ पगारे, तसेच सोयगाव तालुका अध्यक्ष म्हणून भरत पगारे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.त्यांना प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, प्रदेश सचिव वैभव धबडगे, मराठवाडा कार्याध्यक्ष मिलिंद मोकळे, महिला उपाध्यक्ष सुवर्णताई कांबळे, मराठवाडा प्रवक्ता पवन पाखरे, संभाजीनगर जिल्हा प्रभारी विलास गंगाधर पगारे, संभाजीनगर पूर्व जिल्हा अध्यक्ष शिवाजी बागुल, शहर अध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्ठा संख्येनी उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन डी एन जाधव व प्रा.संजय बोरकर यांनी केले होते.फोटो ओळ :- सोयगाव - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोयगाव तालुका अध्यक्षपदी भारत पगारे यांना नियुक्तीपत्र देतांना प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते व प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, प्रदेश सचिव वैभव धबडगे, मराठवाडा कार्याध्यक्ष मिलिंद मोकळे, महिला उपाधक्ष सुवर्णताई कांबळे, मराठवाडा प्रवक्ता पवन पाखरे, संभाजीनगर जिल्हा प्रभारी विलास गंगाधर पगारे, पूर्व जिल्हा अध्यक्ष शिवाजी बागुल