*एकही पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही -पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार*

*एकही पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही -पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार*



सोयगाव प्रतिनिधी मुस्ताक शह                                                                   प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सिल्लोड - सोयगाव तालुक्यात जवळपास 6 हजार लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. मात्र उर्वरित जे लाभार्थी राहिलेत त्यांना तीन टप्यात मंजुरी मिळणार आहे असे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सांगितले. ज्यांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही, काही जण गायरान, गावठाण मध्ये अनेक वर्षांपासून राहत आहे. अशा लाभार्थ्यांचा जागेचा तिढा सोडून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येईल एकही पात्र लाभार्थी घटकूल योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिली प्रधानमंत्री आवास योजना टप्प्या क्र.2 अंतर्गत सोयगाव तालुक्यातील 1 हजार 682 लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले असल्याची माहिती पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यामुळे बेघरांचे स्वप्न साकार होऊन त्यांना हक्काचे घर मिळणार आहे.येत्या 15 तारखेला प्रधानमंत्री मा.ना.नरेंद्रजी मोदी यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचा लाभ जमा होणार आहे. 

अनुसूचित जाती / जमाती व इतर अशा लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कडे गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी सादर केल्या आहेत. त्याअनुषंगाने सदरील लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड , बँक पासबुक, जातीचा दाखला, नरेंगाचे जॉबकार्ड, स्वतःची जागा उपलब्ध असल्याचा दाखला पंचायत समितीत दाखल करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new