सोयगाव : संत ज्ञानेश्वर महाविद्यालचे विद्यार्थी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रावीण्य ; विभाग स्तरावर निवड

सोयगाव : संत ज्ञानेश्वर महाविद्यालचे विद्यार्थी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रावीण्य ; विभाग स्तरावर निवड 

 


जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद.

 छ्त्रपती संभाजीनगर विभागीय क्रिडा संकुल येथे १९ वयोगटातील खेळाडूसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सोयगाव संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची कनिष्ठ विभागाची विद्यार्थिनी कु. पूजा विष्णू मापारी (११ सायन्स) हिने जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थिनीची विभाग स्तरावर निवड झाली आहे.त्याचप्रमाने महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल भरत पगारे (११ वी सायन्स) हिने जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवला आहे.

त्यांच्या या उतुंग यशाचे  संस्था अध्यक्ष रंगनाथ काळे, व सचिव प्रकाश काळे, सचिव, तसेच  प्राचार्य डॉ. शिरीष पवार, डॉ. आर.के. बारोटे , प्रा.उल्हास, पाटील,प्रा.शेख तोफिक,प्रा.रवी जाधव, प्रा.निकम,प्रा.निलेश देशमुख व देशमुख मॅडम आदींनी  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या उत्तुंग शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

फोटो ओळ: सोयगाव - सोयगाव :  जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अवल आलेले संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new