इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित भक्तिरंग भजन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस

इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित भक्तिरंग भजन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस


वितरण समारंभ व धुळे तालुक्यातील कीर्तनकार महाराज यांचा सत्कार समारंभ*


धुळे ०१.(गोकुळ देवरे.)येथील स्वामीनारायण मंदिर प्रांगणात दि.१६ ऑगस्ट.२०२४ पासून भक्तीरंग भजन स्पर्धा संपन्न झाला.यावेळी देहू येथील श्री.गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंगजी घुले महाराज यांचे कीर्तनाचे देखील आयोजन केले त्यांनी आपल्या कीर्तनात तुकाराम महाराज यांच्या गाथेचा महिमा सांगितला व इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानने अध्यात्मिक, शैक्षणिक,आरोग्य व सामाजिक कार्याचा गौरव केला.तसेच इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित भजन स्पर्धेतील भजनी मंडळ यांना बक्षीस वितरण व धुळे तालुक्यातील कीर्तनकार महाराज यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.दादाजी भुसे साहेब,शिंदखेडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयकुमार रावळ,धुळे लोकसभेचे मा. खासदार डॉ.सुभाषजभामरे, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या हस्ते  करण्यात आला.यावेळी सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.दादाजी भुसे साहेब,माजी केंद्रीय मंत्री डाॅ.सुभाषजी भामरे,राज्याचे माजी मंत्री आ. जयकुमारभाऊ रावल यांनी आपल्या मनोगतातून,इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून  केलेल्या कार्याचा गुणगौरव केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद आमच्या कार्यासाठी मोलाचे असुन अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरना यानिमित्ताने मिळाली.

या समारंभास,स्वामीनारायण मंदीराचे प्रमुख पूज्य आनंदजीवन स्वामी,मुंबई येथील महामंडलेश्वर प.पू.परमेश्वरजी महाराज,गोंदूर पाठशाळेचे प्रमुख ह.भ.प.सुदर्शन महाराज गायकवाड,अखिल भारतीय परिषदेचे महंत सतीषदास महाराज भोंगे,मा.आमदार राजवर्धन कदमबांडे,भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,भाजपचे प्रवक्ते संजय शर्मा,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले,अशोक सुडके,मा.सभापती बापूसाहेब खलाणे,शिक्षण व आरोग्य सभापती पंकज कदम,तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील,जि.प.सदस्य राम भदाणे, आशुतोष पाटील,संग्राम पाटील, किशोर हालोर,ज्ञानेश्वर चौधरी, विद्याधर पाटील,ह.भ.प.मधुकर महाराज,कोमलसिंग महाराज, प्रकाश महाराज शास्री,पंकज महाराज,जयश्रीताई अहिरराव, भारतीताई माळी, पं.स.उपसभापती देवेंद्र माळी सह धुळे तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,विकास सोसायटी चेअरमन,सदस्य,पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new