शेवगांव पोलिसांचा दणका मोडला शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कुटुंबांचं वाटोळं करणारांचा मणका !!!*
शेअर मार्केटच्या नावाखाली २ कोटी ५६ लाख रुपयांचा गंडा घालणारे फरार आरोपी ऋषिकेश ज्ञानेश्वर कोकाटे व अमोल मोहन तहकिक या दोघांना पोलीसांनी सापळा लावुन पुणे येथुन केले शिताफीने केलं जेरबंद*
यूसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक...
9763265211
या बाबत सविस्तर वृत्त असे की प्रविण विक्रम बुधवंत यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी भगवानबाबा व्ही.के. ट्रेड्रीग सोलुशन नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे ऑफीस लाडजळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर येथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- ६०८/२०२४ भादवि कलम ४२०, ४०९, ४०६, ३४ प्रमाणे दिनांक- २०/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेवगांव चे नवनियुक्त डयाशींग पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी १) ऋषिकेश ज्ञानेश्वर कोकाटे २) अमोल मोहन तहकिक दोन्ही रा. लाडजळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर हे पुणे येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीस पथक तयार करुन पुणे येथे आरोपीना ताब्यात घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. तपास पथकाने पुणे येथे जावुन मांजरी हडपसर, पुणे येथुन दोन्ही आरोपी पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात असताना दिनांक- ०१/०९/२०२४ रोजी पहाटे ०५/०० वाजता च्या सुमारास चारचाकी वाहणाने पळून जात असताना पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही समाधान नागरे, पो.स.ई. भास्कर गावंडे, पो.हे.कों. किशोर काळे, पो.कों. शाम गुंजाळ, पो.कॉ. संतोष वाघ, पो.काँ. राहुल खेडकर, पो.कों. बप्पासाहेब धाकतोडे, पो.कों. संदिप म्हस्के पो.कों. राहुल आठरे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो.कॉ. राहुल गुड्डू यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पो.स.ई. भास्कर गांवडे हे करत आहेत ताजा कलम* या व इतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैभव कोकाटे हा मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाला आहे वैभव कोकाटे यांच्या शेअर ट्रेडिंग घोटाळ्याची व्याप्ती अहमदनगर जिल्ह्यात सहस संभाजीनगर आणि शेजारच्या बीड जिल्ह्यातही आहे त्याने हजारो गुंतवणूकदारांना फसवले आहे शेवगावची कर्तव्यदक्ष पोलीस त्याला नक्की शोधून काढतील अशी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे*युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक