*आंतरराष्ट्रीय दर्जाचे ओझर विमानतळाचा सर्वांगीण विकास व्हावा :डॉ. भारती पवार*
(यूसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक )*
केंद्रीय नागर विमानन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी.
नाशिकः नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आशियायी देशांसोबत जोडले जाण्यासाठी ओझर विमानतळाचा सर्वांगीण विकास करत कार्गो सेवा व हवाईसेवा सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय आरोग्य व जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय नागर विमानन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी माननीय मंत्री खाडे साहेब देखिल उपस्थित होते.
नाशिक विमानतळाने आंतरराष्ट्रीय वाहतूक हाताळली पाहिजे. दुबई,अबुधाबी, मस्कत, बहारीन, नेपाळ, म्यानमार, थायलंड यासह इतर महत्त्वाच्या आशियाई देशांशी थेट जोडलेले असावे. या हालचालीमुळे ओझर कार्गो विमानतळावर औद्योगिक, कृषी माल आणि औषधांची निर्यात जगाला अधिक जलद गतीने करता येईल. पर्यटनाला चालना देण्यासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील झपाट्याने विकसित होणारा जिल्हा आहे. धार्मिक संस्कृती सह कृषी उद्योग आणि फळ उत्पादक क्षेत्रासाठी देशात -विदेशात प्रसिद्ध आहे. कृषी माल विदेशात पाठविण्याची सोय झाल्यावर शेतकऱ्यांचा पर्यायाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात तो मैलाचा दगड ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत भारताला विमान वाहतूक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याच्या आपल्या ध्येयासाठी सर्वच कटिबध्द असून तसे प्रयत्न सुरू आहे. नाशिकच्या ओझर विमानतळाचा पूर्ण क्षमतेने विकास करणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी प्रदान करणे ही काळाची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्राकडून लवकरच ओझर विमानतळाचा विकास होईल, असा विश्वासही भारती पवार यांनी व्यक्त केला आहे. चौकट कुंभमेळ्या च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी गरजेची*नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक येण्याची अपेक्षा आहे. जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला भेट देतील. श्री सप्तशृंगी देवी आणि इतर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी देणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विमान सेवा अत्यंत महत्त्वाचे आहे. एअर कनेक्टिविटीमुळे भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यादृष्टीने देखील आपण नियोजन करावे अशी मागणीही भारती पवार यांनी केली आहे.