पिंपळनेर येथे शांतता समितीच्या बैठक; आगामी सण-उत्सव शांततेने साजरा करा

पिंपळनेर येथे शांतता समितीच्या बैठक;

आगामी सण-उत्सव शांततेने साजरा करा


-विभागीय पोलिस अधिकारी संजय वाबळे



पिंपळनेर,दि.2(अंबादास बेनुस्कर)

येथील समर्थ सद्‌गुरु श्री खंडोजी महाराज यांची पुण्यतिथी 196 वा नामसप्ताह महोत्सव, गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद सण उत्सव सर्व नागरिकांनी समन्वयाने व शांततेने साजरे करावे,तसेच शहराचा लौकिक कायम राखण्यासाठी गावातील विविध समित्यांनी सहकार्य करून यात्रोत्सव व महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन विभागीय पोलिस अधिकारी संजय वाबळे यांनी पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले पिंपळनेर पोलिस ठाण्यात काल सायंकाळी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी समितीचे अध्यक्षस्थानी विभागीय पोलिस अधिकारी संजय वाबळे होते,तर प्रमुख पाहुणे विठ्ठल मंदिर संस्थांचे मठाधिपती योगेश्वर महाराज, सहायक पोलिस निरीक्षक किरण बर्गे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश मोहणे,पीएसआय भूषण शेवाळे व्यासपीठावर उपस्थित होते,तर शांतता समितीच्या बैठकीसाठी शहरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष,सदस्य,कुस्ती समितीचे सदस्य,सोंग पायंदळी मंडळ,ट्रॅक्टर वहन मंडळ,सामाजिक संघटनेचे सदस्य पदाधिकारी,तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत संजय वाबळे यांनी उत्सव हा गावाचा असल्याने सर्व नागरिकांनी तो आनंदात साजरा करावा,कुठलाही अनुचित प्रकार उत्सवात घडून न देता जातीय सलोख्याचे दर्शन दाखवावे,तर समिती सदस्यांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन केले.यानंतर विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी नामसप्ताह उत्सवाची माहिती देत,उत्सवात सामाजिक आनंद ठेवण्याचे आवाहन केले.यानंतर,काँग्रेस शहर अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी यांनी यात्रा उत्सवात येणाऱ्या रस्ते, वाहतुकीचा प्रश्न,पार्किंग, चौकाचौकात पोलिस व होमगार्डचा बंदोबस्त ठेवणे, प्राथमिक आरोग्यसेवा या सोडविण्याची मागणी केली. बैठकीसाठी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी गणेश मंडळ सदस्य सर्वपक्षीय सदस्य पदाधिकारी मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new