कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा; शेख अब्दुल रहीम

कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा; शेख अब्दुल रहीम


शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि 

राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन सादर!


छत्रपती संभाजीनगर: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचे खालील प्रश्न प्रलंबित असून ते त्वरीत सोडवून शिक्षकांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच शालेय शिक्षणमंत्री मा.ना.श्री.दिपकजी केसरकर साहेब यांना मंत्रालयात सादर करण्यात आले...


१) १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच तशीच लागू करण्यात यावी. 

२) दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी काढलेला २० पटीच्या आतील शाळेवर कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.

३) १५ मार्च २०२४ रोजीचा सुधारित संच मान्यतेचा नवीन शासन निर्णय रद्द करावा. 

४) सातव्या वेतन आयोगाप्रमाणे असणारी १०-२०-३० अशी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना सरसकट लागू करावी.

५) राज्यातील सर्व शिक्षकांची BLO च्या कामातून मुक्तता करण्यात यावी.

६) शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना सुरू करण्यात यावी..


#कार्य नव्हे कर्तव्य ✊🏻

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new