एन.एस.पि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती.

एन.एस.पि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती.


पिंपळनेर,दि.5(अंबादास बेनुस्कर)येथील कै.नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक शाडू माती पासून गणपती तयार करणे ही कार्यशाळा झाली.या कार्यशाळेत  विद्यालयातून इयत्ता 5 वी ते 8 वीतील 162 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शाडू माती पासून गणपती तयार केला.शाळेतील कलाशिक्षक प्रमोद गोविंदराव गांगुर्डे यांनी दुपार सत्रात 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून सुबक व रेखीव  गणेश मूर्ती तयार करून घेतल्या.कार्यशाळेत तयार केलेल्या शाडू मातीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा प्रत्येक विद्यार्थ्याने घरोघरी करावी आणि निर्माल्य नदीत न टाकता आपल्या परिसरातील प्रत्येक घरातून त्याचे संकलन करून त्यापासून खत तयार करावे यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे आव्हान करण्यात आले.सदर कार्यशाळा पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक सागर शहा,प्रवीण पाटील प्रदीप वाघ,सचिन जाधव,सनी गांगुर्डे,पवन पाटील यांनी सहकार्य केले.

पर्यावरण पूरक उपक्रम राबवल्याबद्दल विद्यालयातील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे विधायक समिती पिंपळनेर या संस्थेचे अध्यक्ष सुभाष दामोधर जगताप, सचिव महेंद्र गांगुर्डे,विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एल. गोयकर,उपमुख्याध्यापक अतुल भदाणे व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new