*आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज संवत्सर येथे विविध शासकीय
योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व ग्रामस्थांशी संवाद साधला.*
यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते 70 लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या संवत्सर (दशरथवाडी) ते दहेगाव रस्त्याच्या डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी 22.78 कोटी रुपये निधीतून सुरु असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.
संवत्सर येथे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या माध्यमातून 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय, मनाई वस्ती औद्योगिक वसाहत, संवत्सर - कान्हेगाव रस्ता, संवत्सर - भोजडे - धोत्रे रस्ता, तलाठी कार्यालय आदी प्रमुख कामांसह रस्ते व विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. यातून झालेल्या व होत असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.