शेंदवडच्या रमिला गावितने पटकाविला प्रथम क्रमांक नागरिकांनी घेतला


शेंदवडच्या रमिला गावितने पटकाविला प्रथम क्रमांक नागरिकांनी घेतला वनभाज्यांचा आस्वाद : बारीपाडा येथील वनभाजी महोत्सवाचा समारोप


पिंपळनेर,दि.30

(अंबादास बेनुस्कर)गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वनभाजी महोत्सवात शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वनभाजी स्पर्धेत साक्री तालुक्यातील शेंदवड येथील रमिला पोपट गावीत या युवतीने जंगलातील आळीब,फांद्या,ओवा, बाफळी,बांबू कोम्ब,कडव्या, हलुंद,केलभाजी आदी विविध प्रकारच्या 155 स्पर्धेत ठेवल्या होत्या.सर्वाधिक वनभाज्या ठेवल्यामुळे आयोजकांनी रमिला गावित या युवतीचा प्रथम क्रमांक जाहीर करून तिला रोख 11 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले.यावेळी तीन दिवसीय वनभाजी महोत्सवाचाही समारोप झाला.यावेळी झालेल्या वनभाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक रमिला गावित,द्वितीय तारा कामडे, तृतीय अनिता पवार तर उत्तेजनार्थ भारती अहिरे व सुनीता पवार यांना रोख बक्षीस देण्यात आले.पर्यटन संचालनालय व जैवविविधता संरक्षण समिती,बारिपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा येथे तीन दिवसीय वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश अंबादासराव जोशी,आमदार मंजुळा गावित,जि.प.सीईओ विशाल नरवाडे,मुख्य वन संरक्षक निनु सोमराज,उपवनसंरक्षक नितीन शिंग,उपसंचालक पर्यटन मधुमती सरदेसाई,पुष्पा गावित उपस्थित होते.वनभाजी महोत्सव प्रत्येक गावात होणे गरजेचे*ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात वनभाज्यांचे संवर्धन होते,हे कौतुकास्पद आहे.हा उपक्रम प्रत्येक गावात होणे महत्त्वाचे असून,स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांना जोडून संपूर्ण महाराष्ट्र वनभाज्यांचे प्रसार होणे गरजेचे असल्याचे आवाहन वनभाजी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले माजी न्यायाधीश अंबादासराव जोशी यांनी व्यक्त केले.

नागरिकांनी घेतला वनभाज्यांचा आस्वाद*

या स्पर्धेत महिलांनी जंगलातील आळीब,फांद्या, ओवा,बाफळी,बांबू कोम्ब, कडव्या,हलुंद,केलभाजी,कोहळा,आंबाडी,चित्रक,देवारी,गोगल,गोमठ,जंगलीचूच,मेका,मोका,नागगुल,घोळभाजी,उदळा, पुंजऱ्या,अळीव,ओवा, केनाभाजी,चटक चांदणी, झेला,तुळश्या कंद,चंदळ, शेवरा,राजगिरा,रानतुळस, सोनरु,सोलव्या निंबू, शिरीसफूल,तुराठा,उळशी, उळशीमोहर,वनदोडका, वनस्पतीच्या मुळ्या,पाने फुले,खोड साल,बी आदी विविध वनभाज्या स्पर्धेत ठेवल्या होत्या.स्पर्धेनंतर नागरिकांना या वनभाज्यांचा आस्वादही घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मालती पवार व अभिमन पवार यांनी केले.फोटो ओळी-बारिपाडा येथे 155 वनभाज्यांचे ताट सजवून प्रथम क्रमांक पटकाविलेली शेंदवड येथील रमिला गावित.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new