आळंद गावात पोळा सन हर्स उल्हासाने साजरा करण्यात आला

आळंद गावात पोळा सन हर्स उल्हासाने साजरा करण्यात आला 




आळंद सर्कल प्रतिनिधि. मोबीन बेग. आळंद.आज दि.2 सप्टेंबर 2024 सोमवारी 5- 30 ‌ वाजता ‌ आळंद  येथील ‌ मंदिरासमोर बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या कृषी क्षेत्रात बैलाचा म्हणजेच शेतकऱ्यांच्या प्राणी मित्राचं विशेष योगदान आहे. त्यामुळे आपल्याकडे बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याकडून साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी ‌ बैलांच्या जोडीची शेतकऱ्याकडून पूजा केली जाते त्यांना सजवले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातले जाते. अशाप्रकारे त्यांच्या योगदानाची दखल आणि बैला प्रति असलेल्या प्रेम शेतकरी हा सण साजरा करून दाखवतात. आळंद येथे ‌ बैल पोळा सण प्रसंगी उपस्थित आळंद  येथील सरपंच ‌ कैलास गायके, ‌ वडोद बाजार पोलीस स्टेशनचे बीट जमादार मदने, ‌ पोलीस पाटील साहेबराव चोपडे, ‌ तंटामुक्ती अध्यक्ष कौतिक पायगव्हाण, ‌ योगेश पायगव्हाण, ‌ विजय चव्हाण, ‌ सुनील तायडे उपसरपंच,‌ बबन तायडे, ‌ जगन तायडे, ‌ श्रीकांत भालेराव, ‌ रामेश्वर चोपडे ‌ इत्यादी मानीयर व नागरिक मोठ्या संख्येने पोळा सणात  उपस्थित होते.  तसेच या पोळा सणाच्या बंदोबस्त साठी बडोद पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोकबदोबस ठेवला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new