*सिल्लोड व सोयगाव तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर नेमण्यात येणारे योजनादुत निवडप्रक्रीयेत सावळा गोंधळ-ज्ञानेश्वर मोठे*

*सिल्लोड व सोयगाव तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर नेमण्यात येणारे  योजनादुत निवडप्रक्रीयेत सावळा गोंधळ-ज्ञानेश्वर मोठे*


     


सिल्लोड व सोयगाव दोन्ही तालुक्यातील महाराष्ट्र शासनाने कौशल्या विकास व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजनादुत या प्रमाणे नेमणुक दिली जाणार आहे.सिल्लोड -सोयगाव तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींनी मुद्दाम व हेतुपुरस्कृत या योजनेचा प्रचार प्रसार  केला नाही.त्यामुळे बर्यांच ग्रामपंचायतीमधुन पदवीधर तरुणांचे आँनलाईन अर्ज आलेले नाही.त्यामुळे  आता आँफलाईन अर्ज घेउन आता जवळच्या कींवा वशिल्याच्या कार्यकर्त्यांकडुन आँफलाईन अर्ज मागविणे चालु आहे.जर एखाद्या ग्रामपंचायतीमधुन आँनलाईन अर्ज प्राप्त झाले नसेल .तर त्यांना  परत आँनलाईन अर्ज करण्याची संधी दिली पाहिजे .परंतु  सिल्लोड -सोयगाव तालुक्यातील  योजनादुत योजनेतील संबधित अधिकारी दबावाखाली काम करून हा गैरप्रकार करण्याचे काम चालु असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहे.काहीही असले तरी संबधित विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार व त्यामध्ये  नमुद कार्य पद्धती नुसार या योजनादुतांची नियुक्ती देणे आवश्यक आहे ‌तसे न झाल्यास किंवा जवळचा कार्यकर्ता  वशिलाबाजी योजनादुत नेमल्यास पात्र सुशिक्षित  तरुणावर अन्याय होणार आहे.ही अत्यंत  गंभीर बाब असुन कोणताही गैरप्रकार  होणार नाही याची दक्षता घ्यावी अशाप्रकारे  लेखी निवेदन  गट विकास अधिकारी यांच्याकडे  भारतीय जनता पार्टी सिल्लोड -सोयगाव च्या वतीने देण्यात आले. या  निवेदनावर  मा आमदार सांडु पा लोखंडे,भाजपा प्रदेश चिटणीस सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुक प्रमुख सुरेश बनकर , भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,भाजपा जिल्हा सरचिटणीस  तथा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे  भाजपा तालुकाध्यक्ष अशोक गरुड, भाजपा  जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मिरकर आदिंच्या सह्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new