औरंगाबाद जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये एच आय व्ही जनजागृतीचा कार्य हाती घेऊन काम करत असलेली मराठवाडा ग्रामीण

औरंगाबाद जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये एच आय व्ही जनजागृतीचा कार्य हाती घेऊन काम करत असलेली मराठवाडा ग्रामीण


विकास संस्था MGVS औरंगाबाद 

औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक गावांमध्ये एचआयव्ही साठी जनजागृती करणाऱ्या संस्थेच्या योजना लिंक वर्कर या प्रकल्प अंतर्गत उत्कृष्ट कार्य पूर्ण जिल्ह्याभरामध्ये करत असल्याचं आढळून येतं 

मागील दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये व सिल्लोड शहरांमध्ये सुद्धा एचआयव्ही पोस्टर लावून पोस्टर प्रदर्शन द्वारे एचआयव्ही या विषयावरती तरुणांमध्ये जनजागृती करण्याचं काम लिंक वर्कर विशाल आरसूड हे आपल्या दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत असल्याचा आढळून येतं आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो तर आढळून आले की ते उत्कृष्ट रीतीने लोकांना आरोग्य विषयी माहिती देत असताना आम्ही त्यावेळेस त्यांचे छायाचित्रे घेतले 

यावेळेस सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे आयसीटीसी समुपदेशक मंगेश कांबळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते व लिंक वर्कर योजनेअंतर्गत प्रकल्पाचे सुपरवायझर विशाल पडवळ यांनीही त्या ठिकाणी उभा राहून लोकांना सविस्तर माहिती दिली 

या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी संस्थेच्या डी आर पी अन्नपूर्णा ढोरे मॅडम व संस्थापक अध्यक्ष मनसुख दादा झांबड व संस्थेचे सचिव व प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात येत आहे

Post a Comment

أحدث أقدم

poads

new