*जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा.

*जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा...*



*अमृत योजना व जलजीवन योजना कामे मार्गी लावणे बाबत केल्या विशेष सूचना.*

*जिल्हाधिकारी कार्यलय जळगांव* येथे *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अहिकारी श्री.अंकित* यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील *सर्व नगरपालिका/नगर पंचायतचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी* यांच्याशी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या कामांचा आढावा घेऊन योग्यत्या सूचना केल्या.

यावेळी राज्य सरकारच्या *लाडकी बहिण योजना* पेंडीग प्रकरणे, *मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना* यांची माहिती घेऊन लवकरात मार्गी लावणे बाबत सूचना केल्या. *केंद्र सरकार* पुरुस्कृत *प्रधानमंत्री आवास योजना* अप्राप्त निधी बाबत माहिती घेऊन *जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना व अमृत योजना* कामे संथ गतीने सुरु असून ठेकादार यांना कामे तत्काळ मार्गी लावणे बाबत नोटीस देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच *भुसावळ व मुक्ताईनगर शहर* येथील *अमृत योजना* कामे व जिल्ह्यातील *जलजीवन मिशन* योजनेची कामे प्राधान्याने करणे बाबत विशेष सूचना केल्या. जी एस नाईन न्यूज साठी नितीन सुरवाडे जळगाव

Post a Comment

أحدث أقدم

poads

new