जैताणे येथे गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर 95रक्तदात्यांनी केले रक्तदान

जैताणे येथे गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर 95रक्तदात्यांनी केले रक्तदान



पिंपळनेर,दि.10(अंबादास बेनुस्कर)

साक्री तालुक्यातील जैताणे येथील संघ शक्ती व्यायाम शाळा गणेश मित्र मंडळ व जनकल्याण रक्तपेढी,नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 95 रक्तदांत्यानी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन मा.सरपंच संजय खैरनार,शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रकाश पाटिल,समता परिषदेचे राजेश बागूल,डाॅ.अर्जुन लालचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले.संघशक्ती व्यायाम शाळा गणेश मित्र मंडळ,जयशिवाजी व्यायाम शाळा मित्र मंडळ,गजानन गणेश मित्र मंडळ,महात्मा फुले गणेश मित्र मंडळ,महात्मा फुले व्यायाम शाळा गणेश मंडळासह परिसरातील तरूणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन सामाजिक कार्य पार पाडले.या वेळी सपोनी मयुर भामरे यांनी देखील रक्तदानास सहभाग नोंदवला 95 रक्तदान करणार्या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन केले.मंडळाचे अध्यक्ष राकेश शेवाळे,उपाध्यक्ष समाधान महाले,चेतण भदाणे,धनराज जाधव,कमलेश भामरे,सुरेश सोनवणे,किरण सावंत,दशरथ सोनवणे,नवल खैरनार,सदा महाजन,चेतन खैरनार,गणेश देवरे,भोलेनाथ जगताप,अकित सोनवणे,राहुल गोसावी,नंदु जाधव,लक्ष्मण सोनवणे,किशोर जाधव,लालु देवरे,मेघराज पैठणकर,बन्टी जाधव,हरिष जाधव,आदि सभासद तसेच जनकल्याण रक्तपेढीतील डॉ.अर्जुन लालचंदानी,अशोक पवार,हेमंत महाले,शेखर पाटिल,युवराज ऐडाईत,सागर नरवाडे,संजय सुर्यवंशी,तेजस पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new