पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत 100 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत 100 रक्तदात्यांनी केले रक्तदान 


पिंपळनेर,दि.19(अंबादास बेनुस्कर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा पिंपळनेर मंडल व शहर तसेच जनकल्याण रक्तपेढी नंदुरबारच्या वतीने सेवा पंधरवाडा अंतर्गत पिंपळनेर येथील नगरपरिषद येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 रक्तदात्यांनी रक्तदानात आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे,प्रमुख अतिथी म्हणून इंजि.सेलचे संयोजक रावसाहेब के.टी.सूर्यवंशी, मंडल अध्यक्ष विकी कोकणी, इंजिनिअर सेलचे नंदन साहेब, जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे, सुवर्णा आजगे,शिवसेनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर एखंडे, शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास जाधव योगेश नेरकर,प्रसिद्धी प्रमुख धुळे जिल्हा मोतीराम पोतदार,दौलत महाले,सुभाष नेरकर,शेखर बाविस्कर, नितीन कोतकर,श्याम पगारे,प्रतीक कोतकर,दत्तू पाटील,योगेश कोठावदे, रवींद्र भावसार,प्रकाश अहिरराव,जगदीश धामणे, पंकज चोरडिया,निलेश कोठावदे,रवींद्र कोतकर, अनिल मुसळे,गजेंद्र कोतकर, संजय भिलाणे,दीपक गांगुर्डे, योगेश वाघ,उजक पवार

कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा मोर्चा मंडळाध्यक्ष पंकज भावसार,शहराध्यक्ष युवा मोर्चा कल्पेश नेरकर,आकाश पगारे,रामकृष्ण सोनवणे, संतोष भामरे, गुलाब चौरे, प्रशांत जगताप,किशोर चौधरी,सुरेश जगदाळे,सोनू सोनवणे,मयूर जाधव आधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new