*कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.*
युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक
व्हाट्सअप नंबर 9763265211
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कारखान्याची ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहतूकदार, कर्मचारी, अशी कोणतीच देणी बाकी नाहीत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रुपये ३ कोटी १३ लाख ८४ हजार इतका झालेला असून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांना ह्यावर्षी सर्वाधिक 3050 रुपये दर दिला असल्याचे यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकररावजी चव्हाण, माजी संचालक बाळासाहेबजी कदम, ज्ञानदेवजी मांजरे, विश्वासरावजी आहेर, पद्माकांतजी कुदळे, चंद्रशेखरजी कुलकर्णी, कारभारीनाना आगवण, काकासाहेबजी जावळे, वसंतरावजी दंडवते, बाबासाहेबजी कोते, नारायणजी मांजरे, आनंदरावजी चव्हाण, एम.टी. रोहमारे, राजेंद्रजी गिरमे, मुरलीधरजी थोरात, अॅड. शंतनूजीधोर्डे, अॅड. विद्यासागरजी शिंदे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन,संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद - पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.