*आळंद प्रतिनिधी मोबीन बेग*
दिनांक.7 सप्टेंबर 2024 शनिवार रोजी आळंद ग्रामपंचायत येथे 11 वाजता आळंद ग्रामपंचायत च्या वतीने तालुका स्तरीय
कुस्ती स्पर्धेत काकाजी पायगव्हाण व दीपक बंडू तायडे या दोघांचे ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आळंदी येथील जीवन काकाजी पायगव्हाण 60 किलो गटात तर दीपक बंडू तायडे ५१ किलो गटात प्रथम येण्याचा मान पटकाविल्याबद्दल त्यांचा आळंद ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभा प्रसंगी आळंद ग्रामपंचायत चे सरपंच कैलास गायके, उपसरपंच सुनील तायडे, मा. उपसरपंच रामेश्वर चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष कौतिक पायगव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पायगवान. यांनी जीवन काकाजी पायगव्हाण व दीपक बंडू तायडे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच आजिनाथ शेळके, बंडू तायडे, विजू तायडे, सदाशिव क्षीरसागर, साहेबराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ तायडे , संतु तायडे व तसेच गावकरी या सत्कारावेळी उपस्थित होते.