सोयगाव ( प्रतिनिधी मुस्ताक शहा ) दि.5, वरखेडी तांडा ता. सोयगाव येथे विविध

सोयगाव ( प्रतिनिधी  मुस्ताक शहा ) दि.5, वरखेडी तांडा ता. सोयगाव येथे विविध


विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला. 


यावेळी गावकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांनी येथील महिला भगिनींशी संवाद साधत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री, श्रावण बाळ, तीर्थयात्रा इत्यादी योजनांची माहिती देऊन याचा लाभ घेण्याचे अवाहन केले.वरखेडी तांडा येथील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, याबाबत महिलांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी ना. अब्दुल सत्तार  यांचे आभार मानले.याप्रसंगी सिल्लोड चे माजी सभापती रामदास पालोदकर,माजी जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, धरमसिंग चव्हाण, शिवसेना गटनेता अक्षय काळे, शिवसेना शहरप्रमुख  संतोष बोडखे,तहसीलदार मनीषा मेने, नायब तहसीलदार सतीश भदाणे, जलसंधारण विभागाचे सूर्यकांत निकम, सोयगाव नगर परिषदेतील जंगला तांडा चे सरपंच विनोद जाधव, विशाल चव्हाण, सुरेश चव्हाण, श्रावण जाधव, उमर पठाण, शफीक खा आदिंसह गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new