*सिल्लोड सोयगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या विहीरी, गायगोठ्याचे थकीत 4 कोटी 28 लक्ष शासनाकडुन उपलब्ध -इद्रिस मुलतानी*
*भारतीय जनता पार्टी सिल्लोड-सोयगाव च्या मागणीला यश*
सिल्लोड सोयगाव तालुक्यातील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत शासकीय मंजुरी मिळालेल्या विहीरी,गायगोठ्याची रक्कम बर्याच दिवसापुन थकीत होती,यामध्ये सिल्लोड तालुक्यातील शेतकर्यांचे 4 कोटी 28 लक्ष उपलब्ध झाले असुन पुढील दोन-तीन दिवसात सोयगाव तालुक्याची थकीत रक्कम जमा होणार असल्याची माहिती भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांनी दिली .भारतीय जनता पार्टी सिल्लोड-सोयगाव च्या वतीने भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी प्रधान सचिव महाराष्ट्र रोजगार हमी योजना मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली या निवेदनावर भाजपा प्रदेश चिटणीस सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुक प्रमुख सुरेश बनकर,माजी आमदार सांडु पा लोखंडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे,किसान मोर्चा प्रदेश सचिव मकरंद कोर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक गरुड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मिरकर, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, तालुकाध्यक्ष बद्री राठोड, जि प सदस्य पुष्पाताई काळे,राजेंद्र जैस्वाल , ज्येष्ठ नेते दिलीप काका दाणेकर यांनी सह्या करून शासनदरबारी पाठपुरावा केला व शेतकर्यांच्या हिताच्या मागणीला यश आले.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत थकित उपलब्ध झालेला निधी