वाघापूर येथे मेंढ्यामध्ये पीपीआर आजाराची लक्षणे आढळली;पशुसंवर्धन विभागातर्फे 30 हजार मेढ्यांचे होणार लसीकरण
पिंपळनेर,दि.27(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील मौजे वाघापूर येथे मेंढ्यांमध्ये पीपीआर आजाराचे लक्षणे आढळली. त्यावर उपाय म्हणून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे शिग्र कृती दल स्थापन करून बाधित क्षेत्रामध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे.परिसरातील उर्वरित मेंढ्यांचे लसीकरण रविवारपासून करण्यात येणार आहे.जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी डॉ.अशोक वाडीले तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संदीप निकम, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.योगेश गावित,पशुधन विकास अधिकारी डॉ.विशाल पवार हे लसीकरण मोहीमेत सहभागी होणार असून तालुक्यातील सर्व मेंढपाळ यांनी आपल्या मेंढ्यांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.लसीकरणासाठी सहा पथक तयार केली असून सर्व पथक मिळून एकूण 40 अधिकारी व कर्मचारी हे युद्ध पातळीवर लसीकरण करीत आहेत.दरम्यान,मेंढ्यासोबतच इतर पशुधनाचीही यावेळी तपासणी करावी,अशी मागणी परिसरातील पशुपालकांनी केली आहे.
फोटो ओळी:मौजे वाघापूर येथे मेंढ्याचे लसीकरण करतांना डॉ.अशोक वाडीले तसेच डॉ.संदीप निकम,डॉ.योगेश गावित,डॉ.विशाल पवार आदी.
छाया:अंबादास बेनुस्कर