छ.शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी;राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षातर्फे तहसीलदारांना दिले निवेदन
पिंपळनेर,दि.28(अंबादास बेनुस्कर)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षातर्फे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण जि.सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधित मूर्तिकार,ठेकेदार,संबंधित विभागातील अधिकारी,कर्मचारी व जे कोणी संबंधित विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी व त्याच ठिकाणी चांगल्या दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे,साक्री तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर,किसान सभा प्रदेश उपाध्यक्ष सयाजीराव ठाकरे,किसान सभा जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे,साक्री तालुका उपाध्यक्ष रवी तोरवणे,किसान सभा साक्री तालुका सरचिटणीस अनिल जाधव,हिम्मत ठाकरे,विशाल खैरनार,प्रदीप नांद्रे,प्रकाश नांद्रे,पंकज भदाणे,संदीप पाटील,किशोर पाटील,हिम्मत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.