पिंपळनेरच्या पांझरा नदीला आला पूर;साक्रीत दिवसभर पाऊस,नदी-नाल्यांना आला पूर,
खरीप पिकांना जीवदान
पिंपळनेर,दि.25(अंबादास बेनुस्कर)
साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.मात्र गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यासह माळमाथा परिसर काटवान परिसर तालुक्याच्या सर्व बाजूस समाधानकारक पाऊस पडत आहे.नदी नाल्यांना पाणी आले आहे.पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ही उत्पन्न वाढू शकते तसेच विहिरींच्या ही जलसाठ्यात वाढ होत आहे.तसेच काटवान या भागातील गेल्या दोन दिवसांपासून काही गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस सुरू असून व इतरत्र भागात समाधानकारक पाऊस झालेला आहे.यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे,यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन,मका व इतर खरीप पिकांसाठी उपयुक्त ठरला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या सरी बसल्याने पाण्याची पातळी टिकून आहे.पाटचारीतून पाणी सुरू आहे.तर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पश्चिम पद्यातही पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे तेथील भात व नागली पिकांना पाऊस समाधानकारक ठरला आहे. शुक्रवारी दुपारनंतर हलक्या सरी बरसल्या होत्या.यामुळे बाजारात व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
*5 हजार 500 क्युसेक विसर्ग*
पांझरा,मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढत असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे.निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पातून शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता 5 हजार 500 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पांझरा नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
*पिंपळनेरच्या पांझरा नदीला पूर*
पश्चिम पट्ट्यात संततधार पावसामुळे लाटीपाडा धरण ओसंडून वाहत असुन पांझरा नदीला पूर आला आहे,तसेच कर्म.आ.मा.पाटील विद्यालया जवळील लहान पुलावरही पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे.