तरूणांनी एच.आय.व्ही सारख्या जीवघेण्या आजारापासून लांब रहावे-डाॅ.हेमंत जाधव

तरूणांनी एच.आय.व्ही सारख्या जीवघेण्या आजारापासून लांब रहावे-डाॅ.हेमंत जाधव



पिंपळनेर,दि.26(अंबादास बेनुस्कर) येथील कर्म.आ.मा.पाटील  कला,वाणिज्य आणि कै.अण्णासाहेब एन.के.पाटील  विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर व ग्रामीण रुग्णालय  पिंपळनेर च्या आय.सी.टी.सी.विभागाच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय युवादिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य  डाॅ.एल.बी.पवार होते.राष्ट्रीय  सेवा योजनेचे प्रमुख  प्रा.एल.जे.गवळी हे प्रास्ताविक करतांना म्हणाले की,विविध  वयोगटातील तरूणांमध्ये  समजूतदारपणा यायला हवा.सहकार्याची भावना निर्माण व्हायला हवी.तरूणांनी लोककल्याणासाठी प्रेरीत  व्हायला हवे.उच्च शिक्षण  घ्यायला हवे.राष्ट्रऐक्याची भावना निर्माण व्हायला हवी.मी केवळ माझ्याच साठी नसून इतरांसाठी आहे.अशी भावना निर्माण व्हायला हवी" असे नमूद केले.प्रमुख वक्ते म्हणून आय.सी.टी.सी विभागाचे डाॅ.हेमंत जाधव म्हणाले की,तरूणांनी एच. आय.व्ही सारख्या जीवघेण्या आजारापासून लांब रहावे.एखादी व्यक्ती एच.आय.व्ही बाधित व्यक्तीची हेटाळणी न करता त्याला हिम्मत द्यावी.त्याचे आत्मिक बळ वाढवावे तसेच आपण देखील आपल्या जीवनात  त्यागाची भावना जोपासावी,विशिष्ट ध्येयात प्रावीण्य मिळवावे.मनावर संयम ठेवावा.संगत चांगली धरावी,चुकीच्या गोष्टींकडे आपली पावले जाणार नाहीत  याची काळजी घ्यावी.आरोग्य  सांभाळावे देश हितासाठी आपण मजबूत व कणखर असावे असे सांगितले.दुसरे वक्ते डाॅ.तोरवणे म्हणाले की,भारत तरूणांचा देश असून त्यांनी एड्स सारख्या आजारापासून व व्यसनापासून लांब रहावे.भारताला निरोगी व सक्षम तरूणांची गरज आहे,तरच देशाचा शाश्वत  विकास होईल असे मत व्यक्त  केले.अध्यक्षीय  मनोगतात  प्राचार्य डाॅ.एल.बी.पवार  म्हणाले की,तरूण हा देशाचा महत्वाचा घटक आहे,देशाचं भवितव्य तरूणांच्या खांद्यावर आहे.तरूणांनी नवनवीन  तंत्रज्ञान,विज्ञानाचा वापर करुन देशहितासाठी आपणास  काही करता येईल का,यासाठी नेहमीच आपण निकोप सक्षम जागृत सतर्क असणे गरजेचे आहे.असे सांगितले.या वेळी डाॅ.हेमंत जाधव यांनी आरोग्य  सुव्यवस्थित राहावी म्हणून  सार्वजनिक शपथही घेतली. व्यासपीठावर ग्रामीण  रुग्णालयाचे डाॅ.मयुर निकुम उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ डाॅ.बी.सी मोरे,  डाॅ.एस.पी.खोडके,डाॅ.वाय.एम.नांद्रे,प्रा.डी.बी.जाधव,प्रा.वानखेडे,प्रा.वाघ,प्रा.सुर्यवंशी प्रा.भुषण वाघ व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक  विद्यार्थी हजर होते.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी. डाॅ.एन.बी.सोनवणे यांनी शेवटी कार्यक्रमाचे आभार  मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new